Badhaai Do : Review in मराठी Rajkummar Rao | Bhumi Pednekar | Harshavardhan Kulkarni

Badhaai Do : Review in हिंदी Rajkummar Rao | Bhumi Pednekar | Harshavardhan Kulkarni

Badhaai Do (2022)  : Review

Directed by 
Harshavardhan Kulkarni
Writing Credits
Suman Adhikary 
Akshat Ghildial 
Harshavardhan Kulkarni
Cast  
Rajkummar Rao - Inspector Shardul Thakur
Bhumi Pednekar - Sumi Siñgh
Sheeba Chaddha - Baby Thakur
Hani Yadav Hani Yadav ... Kartikey
Gulshan Devaiah - Advocate Guru Narayan
Loveleen Mishra - Mrs Prem Singh
Nitish Pandey Nitish Pandey - Prem Singh
Seema Bhargava - Shardul's Aunt
Chum Darang - Rimjhim Jhongkey
Mushtaq Khan - Sharmaji
Priyanka Charan Priyanka Charan - Chutki
Nidhi Bhati Nidhi Bhati - Police Officer

सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात लिहिले गेलेले हे गाणे आज पन्नाशीत असलेल्या मंडळींच्या नक्कीच स्मरणात असेल. 'बस यही अपराध मैं हर बार करता हूँ, आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ' हे नीरज यांचे शब्द एका अर्थाने '' या सिनेमाचे निम्म्याहून अधिक सार सांगणारे आहेत. या गाण्यातील शब्दांचा अर्थ माणुसकी असा होता, परंतु अनेकदा गंमतीने त्याचा अर्थ पुरुष असा लावला गेला, म्हणून त्याचा उल्लेख. भारतात समलैंगिक संबंधांना आता मान्यता असली, तरी काही वर्षांपूर्वीपर्यंत तो एक कायदेशीर गुन्हा होता. हाच गुन्हा 'बधाई दो' या सिनेमात शार्दूल आणि सुमन हे करतात. मात्र तो कसा करतात आणि कसा निभावून नेतात हे पाहणं निखळ आनंददायी आहे. आजही समलैंगिक जोडप्याला पाहून नाकं मुरडली जातात, त्यांच्यावर लोक हसतात, त्यांना कटू अनुभवांना सामोरं जावं लागतं. कायदेशीर मान्यता मिळूनही त्यांना 'लोकाश्रय' मिळाला आहे का? हा प्रश्न आजही कायम आहे. समलैंगिक संबंध ही एक विकृती म्हणूनच अनेकांच्या नजरेत आजही घर करून आहे. अशाच लोकांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचं काम दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णीनं कौशल्यानं केलंय. विशेष म्हणजे सिनेमात ही अनोखी गोष्ट मांडताना त्यातील घटना आणि प्रसंगांमध्ये अवास्तव नाट्य लेखकानं घडवलेलं नाही. 'एलजीबीटी कम्युनिटी'ला समजून आणि उमजून घेण्यासाठी कथानक पुरेसा वेळ देतं आणि कथानकाच्या उत्तरार्धाकडे प्रेक्षकांना अंतर्मुख होण्यास भाग पाडतं. तो आपल्यासमोर प्रश्न उभा करतो की? तुम्ही स्वतः समाज म्हणून ही 'गोष्ट' मान्य कराल का? कारण, केवळ कायदेशीर मान्यता मिळून हा प्रश्न सुटणारा नाहीय. जेव्हा 'एलजीबीटी कम्युनिटी'ला समाजमान्यता मिळेल तेव्हाच हा प्रश्न सुटू शकेल. म्हणून लेखक-दिग्दर्शकांनी सिनेमातील नायक-नायिकेला 'हिरोइझम'चा मुलामा दिलेला नाही. सर्वसामान्य भारतीय नागरिक म्हणूनच त्यांना पडद्यावर सादर केलं आहे; जेणेकरून प्रेक्षक स्वत:ला नायक-नायिकेत पाहतील आणि त्यांच्या अडचणी, भावभावना, प्रश्न समजून घेता येईल. हे सर्व करण्यात 'बधाई दो' हा सिनेमा प्रचंड यशस्वी ठरतो आणि एका महत्त्वपूर्ण विषयाला वाचा फोडतो. 'जो शरीराने पुरुष असेल आणि जी शरीराने स्त्री असेल या दोघांमध्येच विवाह होऊ शकतो', असं केंद्र सरकारनं दिल्ली हायकोर्टात दोन वर्षांपूर्वी आपली बाजू मांडताना सांगितलं होतं. दुसरीकडे हिंदू विवाह कायदा, स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट आणि फॉरेन मॅरेज अ‍ॅक्ट अंतर्गत समलैंगिक विवाहांना परवानगी देण्यात यावी, अशी याचिका भारतातील समलैंगिक हक्क चळवळीतल्या काही कार्यकर्त्यांनी २०२०मध्ये दाखल केली आहे. सध्या ही याचिका अद्याप न्यायप्रविष्ट आहे. समलैंगिक संबंध गुन्हा नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा यापूर्वीच म्हणजे २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर प्रकाश टाकण्याचं काम 'बधाई दो' हा सिनेमा करतो. विविध घटकांमधील समलैंगिक प्रश्न आणि त्यांच्या अडचणीदेखील तो आपल्याला सांगतो. आज जे लेस्बियन, गे, बायसेक्श्युअल, ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स म्हणजेच (एलजीबीटी) या नावानं ओळखले जातात त्यांना वैदिक भारतात स्वैरीणी, क्लिबा, कामी, षंढा, नपुंस ही नावं होती. प्राचीन भारतात या लैंगिक ओळखीच्या संदर्भांवर आजही दावे-प्रतिदावे दोन गटात सुरू आहेत. यातूनच एलजीबीटी समूहाला 'लोकाश्रय' मिळवून देण्यासाठी 'बधाई दो' या सिनेमाच्या निमित्त अत्यंत समर्पक असं पाऊल पडलेलं आहे हे निश्चितच. तिशीच्या उंबरठ्यावर असलेले शार्दुल आणि सुमन यांना त्यांच्या कुटुंबियांकडून लवकरात लवकर लग्न करण्यासाठी आग्रह होत असतो. शार्दुल पेशानं पोलिस अधिकारी असतो तर सुमन शाळेत शारीरिक शिक्षण देणारी शिक्षिका (पीटी टीचर) असते. सुमन आणि शार्दुल या दोघांनाही लग्न करायचं नसतं. कारण, शार्दुलला मुलींमध्ये आणि सुमनला मुलांमध्ये रस नसतो. ते समलैंगिक असतात. अर्थात सुमनला मुलीच आवडत असतात, तर शार्दुलला मुलं. पण, ही बाब कुटुंबात इतर कोणालाही माहिती नसते. घरच्यांकडून होणारा आग्रह आणि स्वतःची खरी लैंगिक ओळख लपवण्यासाठी शार्दुल-सुमन एकमेकांशीच लग्न करतात. (भारतात समलैंगिक विवाहाला मान्यता नाही. परंतु समलैंगिक शरीरसंबंधाला मान्यता आहे.) त्यामुळे आता ते एकत्र एका घरात स्वतःच्या वेगवेगळ्या जोडीदाराबरोबर राहू लागतात. आता या दोघांच्या आयुष्यात, कुटुंबात त्यांचं हे बिंग फुटते का? फुटल्यावर काय उलथापालथ होते? स्वतःचे हक्क मिळवण्यासाठी ते काय काय करतात? ते कायदा मोडत नाहीत. पण त्यातून पळवाट काढत त्यांना हवं ते साध्य करतात का? या सगळ्याची वास्तववादी उत्तरं सिनेमात आपल्याला मिळतात. त्यामुळे ही उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रत्येकानं हा सिनेमा जरूर पाहायला हवा. 

Post a Comment

0 Comments